scout guide motto in hindi, english, marathi

स्काऊटचे ध्येय

नमस्कार, आपले All ABOUT SCOUTING  च्या वेबसाईटवर स्वागत!! 

स्काऊटची चळवळ ही शैक्षणिक, अराजकीय, स्वइच्छेने चालवली जाणारी  युवकांची चळवळ आहे. 

ध्येयाविना  जीवन व्यर्थ असते तसेच ध्येयाविना कोणतीही चळवळी व्यर्थ ठरते.  चळवळीचे ध्येय, त्यामागे उद्देश असणे गरजेचे आहे.

           स्काऊट चळवळीचे सुद्धा एक ध्येय आहे जे कायम स्काऊटना त्यांच्या चळवळीच्या उद्देशाची आठवण हे ध्येय करून देते.  

         “तयार रहा”  हे स्काऊट चळवळीचे ध्येय आहे. इंग्रजीमध्ये “Be prepared”.

          शरीराने सदृढ, मनाने जागृत व  नितीने प्रविण राहुन  इतरांना सदैव सहाय्य करण्याकरिता तयार राहण्याचा प्रयत्न करणे हा या ध्येयाच्या आचरणातील महत्त्वाचा भाग आहे.  

या विषयी पण जरूर वाचा  – 

सत्कृत्य म्हणजे काय ?

सर्वधर्म प्रार्थना 

स्काऊट रेल्वे भरती प्रश्नपत्रिका 

         एकदा एका स्काऊटने स्काऊट चळवळीचे जनक असणाऱ्या लॉर्ड बेडन पॉवेल म्हणजेच स्काऊट चे लाडके बी.पी.  यांना विचारले “तयार कशासाठी राहा आणि का?”  या प्रश्नाला उत्तर देताना 

बी.पी. म्हणाले  “कोणत्याही कामासाठी” याचाच अर्थ पडेल ते काम करण्याची स्काऊट ची तयारी असावी.


1)  शरीराने सुदृढ राहणे- 

              स्काऊटने योग्य आहार, व्यायाम इत्यादी आरोग्याच्या नियमांचे पालन करून आपली  शरीररुपी संपत्ती कायम चांगली राखली पाहिजे. योग्य  वेळी योग्य गोष्ट करण्याचे सामर्थ्य व चपळता आपल्या अंगी स्काऊटने आणली पाहिजे. यासाठी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार व आरोग्य विषयक चांगल्या सवयी लॉर्ड बेडन  पॉवेल यांनी त्यांच्या “स्काऊटिंग फॉर बॉईज” या पुस्तकात सांगितल्या आहेत.

2)  मनाने जागरूक – 

              स्काऊट आपले मन,बुद्धी नेहमी कार्यक्षम व जागृत ठेवतात. तसेच दिली जाणारी प्रत्येक आज्ञा पाळण्याची मनाला शिस्त लावतात.

3)  इतरांना सहाय्य – 

इतरांना सहाय्य

               स्काऊटची निरीक्षण शक्ती उत्तम असायला हवी व त्यांनी आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवले पाहिजे. इतरांना सहाय्य करण्याची संधी त्यांनी त्याद्वारे शोधली पाहिजे. इतरांना साह्य करण्याची संधी न  दडवता निस्वार्थ  भावनेने साह्य केले पाहिजे. स्काऊट शिक्षणातील ज्ञान व अनेक कौशल्ये आत्मसात  करून इतरांना त्याच्या पद्धतीने साहाय्य करणे अपेक्षित आहे.


जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत फेसबुक , व्हाट्सअँप वर शेअर करा. तसेच आमचे विडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या व Subscribe करायला विसरू नका.

आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. 

आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा . 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *