नमस्कार मित्रांनो
तुमचे स्वागत आहे All About Scouting वर!!
स्काऊट – गाईडची चळवळ ही तरुणांसाठी चालवली जाणारी शैक्षणिक, गैर-राजकीय व मूल्यांवर आधारित चळवळ आहे, जिचा उद्देश आपल्या देशामध्ये सुजाण, देशप्रेमी नागरिक तयार करणे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल द्वारा स्थापित या चळवळीने शतक पूर्ण केले असून भारतामध्ये ती द भारत स्काऊट्स अँड गाईड्स या संस्थेमार्फत चालवली जाते.
स्काऊट-गाईडच्या चळवळीतून भारतासाठी सुजान नागरिक घडत असतात. स्काऊट-गाईड चळवळीस प्रोत्साहन मिळावे व विद्यार्थ्यांच्या या मूल्याधारित चळवळीकडे ओढा वाढवा यासाठी भारतातील विविध संस्था ह्या स्काऊट-गाईडना विशेष सवलती, लाभ देत असतात.
उदा.भारतीय रेल्वेमध्ये स्काऊट- गाईडसाठी राखीव स्वतंत्र भरती किंवा दहावी,बारावी बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण आदी. प्रोत्साहन पर लाभ स्काऊट गाईडला मिळत असतात.
भारतीय रेल्वे मधील स्काऊट-गाईड साठी राखीव पदांसाठीच्या भरती विषयी माहिती घेण्यासाठी येथे Click करा .
तसेच दहावी,बारावी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण कसे मिळतात हे जाणून घेण्यासाठी येथे Click करा.
आता या स्काऊट-गाईडच्या सवलती मध्ये अजून भर पडली असून ते स्काऊट-गाईड भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करू इच्छितात म्हणजेच MBBS, BDS करून डॉक्टर बनू इच्छितात त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे.
स्काऊट गाईड चळवळीत काम करत असताना स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे धडे दिले जातात व प्रत्येक स्काऊट व गाईंना उत्तीर्ण होण्यासाठी ‘ॲम्बुलन्स मॅन’ चे अनिवार्य असे निपुणता /प्राविण्य पदक पूर्ण करावेच लागते. प्रथमोपचार वेळेत केल्यास रोग्याचा जीव वाचण्याच्या संधी वाढतात. स्काऊट-गाईड हे प्रथमोपचार करण्यात कौशल्यपूर्ण असतात. त्यांच्या ह्याच कौशल्यामुळे, त्यांना भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण होऊ शकते. स्काउटिंगच्या चळवळीची मूळ भावना “सेवा” ही असून स्काऊट-गाईड ने ती भावना आत्मसात केलेली असते. त्यामुळे भविष्यात हेच स्काऊट-गाईड वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करून चांगली वैद्यकीय सेवा ही आपल्या राष्ट्राच्या प्रति अर्पण करू शकतात.
त्यांच्या याच सेवामूल्यास चालला देण्यासाठी डॉ. NTR आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आंध्रप्रदेश विजयवाडा या विद्यापीठात MBBS व BDS च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये द भारत स्काऊट्स अँड गाईडच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व अन्य प्रमाणपत्र धारक स्काऊट गाईडसाठी 2022-23 शैक्षणिक वर्षात 0.5% आरक्षण दिले आहे. अर्ज करणाऱ्या स्काऊट- गाईड नी NEET UG-2022 ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सदर आरक्षणासाठीचे परिपत्रक येथे Click केल्यावर पाहण्यास मिळेल.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणे तर अवघड आहेच परंतु त्याचा अभ्यासक्रमात. प्रवेश मिळवणे याहून अवघड प्रक्रिया आहे. अशा वेळेस आरक्षित जागा फायद्याच्या ठरतात. स्काऊट-गाईडच्या चळवळीत सहभागी होऊन विद्यार्थी आशा सवलतींचा लाभ घेऊ शकतात.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात स्काऊट-गाईड साठी जागा आरक्षित होण्याचे हे पहिले पाऊल आहे. भविष्यात अन्य वैद्यकीय विद्यापीठे डॉ.NTR आरोग्य विज्ञान विद्यापीठासारखे स्काऊट-गाईड साठी जागा आरक्षित करतील व त्यांचा फायदा भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात सेवाकार्य करू इच्छिणाऱ्या स्काऊट-गाईडना होत राहील हीच अपेक्षा.
आपल्या या स्काउटिंग ब्लॉगचे वाचक म्हणून तुम्ही येथे पर्यंत पोहोचला असाल तर आपले आभार!
या विषयी पण जरूर वाचा –
स्काऊट रेल्वे भरती प्रश्नपत्रिका
जर तुम्हाला स्काऊट गाईड चळवळी विषयी अजून माहिती हवी असेल तर येथे Click करा. तसेच आपल्या All ABOUT SCOUT या YouTube चॅनेलला Subscribe करा. भेट देण्यासाठी येथे Click करा.
जय हिंद ! वंदे मातरम !!
आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
आम्हाला इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा .