स्काऊटचा अभ्यासक्रम विविध टप्प्या मध्ये विभागला आहे . स्काऊट अभ्यासक्रमातील प्रवेशचा अभ्यासक्रम हा स्काऊट शिक्षणातील पहिला टप्पा आहे. ह्या टप्प्या पासून एका मुलाचा स्काऊट चळवळीतील प्रवास सुरु होतो . 

प्रवेश अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या मुलाचे वय  किमान १० वर्षे असणे  गरजेचे आहे. प्रवेश अभ्यासक्रमाचा कालावधी हा ३ महिन्यांचा आहे .  प्रवेश अभ्यासक्रमाची परीक्षा ही शालेय स्तरावर स्काऊट मास्टर घेतात.  त्यासाठी वचनविधी आगोदर त्याला खालील अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. 


प्रवेश अभ्यासक्रमाचे ठळक मुद्दे – 

1 स्काऊट चळवळीचा मूळ इतिहास 

2 स्काऊटचे नियम  (अधिक माहिती घ्या )

3 स्काऊटचे वचन (अधिक माहिती घ्या )

4 स्काऊटचे ध्येय ,खूण ,वंदन ,हस्तांदोलन

 5 सत्कृत्य (अधिक माहिती घ्या )

6 स्काऊट गणवेश 

7 विविध ध्वज – राष्ट्रध्वज, जागतिक स्काऊट ध्वज, भारत स्काऊट आणि गाईड ध्वज

8 स्काऊट गाईड प्रार्थना (अधिक माहिती घ्या )

झंडा गीत (अधिक माहिती घ्या )

10 राष्ट्रगीत 

11 युनिटच्या चार मेळाव्यांना उपस्थिती 

12 वचनविधी 


स्काउटमास्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण होताच ८ दिवसांत वचन विधी घ्यावा आणि प्रवेश पदक समारंभ पूर्वक स्काऊटना प्रदान करावे. वचनविधी पूर्ण झाल्या वर तो नवीन मुलगा स्काऊट बनतो व त्याचा स्काऊट म्हणून पुढील प्रवास सुरु होतो . 


Spread the love