स्काऊट हस्तांदोलन
दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा आपण आणि त्या त्या लोकांना भेटल्यानंतर अभिवादन म्हणून आपण अगणित वेळा हस्तांदोलन करतो. भेटणारे व्यक्ती तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे सहकारी किंवा अनोळखी व्यक्ती असू शकतात. हस्तांदोलन केल्याने समोरील व्यक्तीस मैत्रीचा व आत्मविश्वासाचा संदेश मिळतो. समोरील व्यक्ती हा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे या हस्तांदोलना वरून समजते.
स्काऊट चळवळीचे लॉर्ड बेडन पॉवेल यांनी त्यांच्या स्काऊटिंग फोर बॉईज या आपल्या पुस्तकात विविध गोष्टी सांगितल्या आहेत. स्काऊटच्या डाव्या हाताच्या हस्तांदोलना ची संकल्पना ही या पुस्तकात सांगितलेल्या एका गोष्टीपासून आली आहे. या पुस्तकात सांगितलेल्या युद्ध घटनेमुळे स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या मनात ही संकल्पना आली.
प्रम्पेह राजाची कथा-
साल १८९६ , दक्षिण आफ्रिका स्थित अशांती जमातीशी युद्ध करून स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी अशांती जमातीच्या राजधानीमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांची भेट त्या अशांती जमातीच्या राजाशी म्हणजेच राजा प्रम्पेह सोबत झाली.
लॉर्ड बेडन पॉवेल यांनी राजा प्रम्पेहशी हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात पुढे केला. परंतु लॉर्ड बेडन पावेल यांच्याशी युद्धात हरलेला राजा प्रम्पेहने त्याचा डावा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. त्याच्या या कृतीने लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या मनामध्ये या वेगळ्या कृतीबद्दल कुतूहल जागे झाले. त्यांनी राजा प्रम्पेहला त्याच्या या कृतीबद्दल प्रश्न विचारला.
लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या या जिज्ञासूपणाचे उत्तर देताना राजा प्रम्पेहने सांगितले की, ” आमच्या येथील या अशांती जमातीतील शुरात शूर व्यक्ती ह्या अभिवादन म्हणून हस्तांदोलन करताना आपला डावा हात वापरतात. त्यांचा असा समज आहे की, आपल्या डाव्या हातातील ढाल ही आपली संरक्षक असते, ती बाजूला सारून आपण समोरच्याशी विश्वासाने हस्तांदोलन करतो म्हणजेच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो.”
लॉर्ड बेडन पॉवेल यांना ही अशांती जमातीची पद्धत फार आवडली, आणि त्यांनी या पद्धतीचा वापर स्काऊट चळवळीत सुरू केला.
डावा हातच का वापरावा?
मानवी शरीरामध्ये हृदय हे डाव्या बाजूला असते, त्यामुळे डाव्या हाताने हस्तांदोलन केल्यास समोरील व्यक्ती ही आपल्या हृदयात आहे असा संदेश समोरच्या व्यक्तीस मिळतो. त्याचबरोबर डाव्या हाताचे हस्तांदोलन हे जुन्या मान्यतेनुसार वीरता व आदर याचे प्रतीक आहे.
त्यामुळेच स्काऊट हे नेहमी डाव्या हाताने हस्तांदोलन करतात. तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत डाव्या हाताने हस्तांदोलन करण्याची पद्धती अवलंबावी, जेणेकरून या हस्तांदोलनाची सर्वांना माहिती होईल.
खरा स्काऊट कसा ओळखावा?
खरा स्काऊट ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. एखादी व्यक्ती भेटल्यास त्याला अभिवादन करण्यासाठी हस्तांदोलन करताना डावा हात समोर करा ,जर समोरील व्यक्ती हस्तांदोलन करताना गडबडली, तर समजून जा की, समोरील व्यक्ती खरा स्काऊट नाही. धन्यवाद!
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर खाली कमेंट करा आणि आपल्या मित्रांना व्हाट्सअप फेसबुक वर पाठवा.
जय हिंद ,वंदे मातरम.