स्काऊटचे नियम –

स्काऊट म्हणून शपथ घेण्यापूर्वी प्रत्येक शपथ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस स्काऊटचे नियम माहित असले पाहिजेत . ते कायम त्याच्या लक्षात असले पाहिजेत आणि त्यानुसार त्याने आयुष्यभर वागले पाहिजे व ते नियम काटेकोर पणे पाळले पाहिजेत .

स्काऊट चा नियम एक आहे व त्याचे नऊ भाग आहेत. 

१) स्काऊट विश्वसनीय असतो .

२) स्काऊट निष्ठावान असतो .

३) स्काऊट सर्वांचा मित्र असतो आणि इतर स्काऊट चा बंधू असतो .

४) स्काऊट विनयशील असतो .

५) स्काऊट प्राणी मात्रांचा मित्र असतो व निसर्गावर प्रेम करतो .

६) स्काऊट शिस्त प्रिय असतो व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यास मदत करतो .

७) स्काऊट धैर्यवान असतो .

८) स्काऊट काटकसरी असतो .

९) स्काऊट चे विचार , उच्चार आणि आचार पवित्र असतात .

स्काऊटचे नियम हे मानवी आयुष्यात चांगलेपणा आणतात. स्काऊटचे नियम पाळणारी व्यक्ती ही त्याच्या देशाची सर्वोत्तम नागरिक असते. 


स्काऊटचे नियम क्रमवार लक्षात राहण्यासाठी काही टिप्स –

                                      वि नि मि
                                      वि प्रा शि
                                      धै का वि

वर दिलेल्या ३ ओळी पाठ कराव्यात.
वापर कसा करायचा ?

सोप्प आहे ,
वि – म्हणजे  विश्वसनीय
नि – म्हणजे निष्ठावान
मि – म्हणजे मित्र
वि – म्हणजे विनयशील
प्रा – म्हणजे प्राणी
शि – म्हणजे शिस्तप्रिय
धै – म्हणजे धैर्यवान
का – म्हणजे काटकसरी
वि – म्हणजे विचार

बाकी सर्व वाक्ये सारखीच आहेत .

खालील व्हिडिओचा वापर करून सुद्धा आपण स्काऊट चे नियम समजावून घेवू शकता .



Spread the love

One thought on “स्काऊटचे नियम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *