फ्री हॅम रेडिओ प्रशिक्षण
नमस्कार ऑल अबाऊट स्काऊटिंग च्या वेबसाईट वर आपले स्वागत.
अम्याच्युअर रेडिओ ऑपरेटरला हॅम रेडिओ ऑपरेटर किंवा फक्त HAM देखील म्हटले जाते.
अम्याच्युअर रेडिओ एक छंद आणि तसेच राष्ट्रासाठी सेवा आहे
या छंदामध्ये सरकारव्दारे अधिकृत व्यक्ती या स्वशिक्षणाद्वारे संपर्क प्रस्थापित करणे,संपर्काचे तंत्रज्ञान विकसित करणे,आदी उपक्रम करत असतात.
या HAM रेडिओच्या छंदांमध्ये कोणताही आर्थिक स्वार्थ नसतो.
या संपूर्ण जगात .५० लाखाहून अधिक लोक त्यांच्या फावल्या वेळात या छंदांमध्ये सहभागी होतात. भारतामध्ये आजमितीला २० हजारांच्या घरात हॅम्स आहेत.
अम्याच्युअर रेडिओ ऑपरेटर किंवा हॅम रेडिओ ऑपरेटरला भारत सरकारच्या संचार मंत्रालयाने घेतलेल्या परीक्षेस पात्र ठरवावे लागेल आणि त्यानंतरच रेडिओ स्टेशन चालविण्यासाठी परवाना मिळतो.
भारतात अशी दूरसंचाराची साधने सरकार सशस्त्र बले जसे आर्मी , पोलिस यानंतर फक्त हॅम्सलाच परवानगी देते, सामान्य माणसासाठी ती यंत्रे वापरण्यास बंदी आहे.
आपल्या फावल्या वेळात, हॅम रेडिओ चालक आपल्या उपकरणांचा वापर करून भारतभर तसेच विश्वभर सांस्कृतिक, व्यक्तिगत, तंत्रज्ञानाच्या माहितीचे आदानप्रदान करत असतात.
रेडियो ट्रांसमीटर, रिसीवर, एंटीना यांचा वापर करून हॅम ऑपरेटर ध्वनी, मोर्स कोड, डिजिटल अथवा अवकाशातील उपग्रहाच्या माध्यमातून संपर्क करत असतात.
हॅम रेडिओ का शिकायचा ?
तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपला स्मार्ट फोन संवादासाठी सहज वापरु शकतो मग हॅम रेडिओ का आवश्यक आहे? आज हॅम रेडिओ कितपत उपयोगी आहे? होय आहे. पूर, चक्रीवादळ, भूकंप भूकंप अशा विविध आपत्ती दरम्यान हॅम रेडिओने हे दाखविले की हॅम रेडिओ कसा उपयुक्त आहे.
सध्याच्या दक्षिण भारतात आलेल्या निवार चक्री वादळात हॅम्सनी कशी मदत केली? ते येथे पहा.
जेव्हा आजचे विकसित तंत्रज्ञान अयशस्वी होते, तेव्हा हॅम रेडिओ उपयोगात येतो. आपत्तीच्या वेळी हॅम रेडिओचा वापर आपत्कालीन संप्रेषण साधन म्हणून केला जातो.
स्काऊट म्हणून, एखादा मुलगा संदेश देण्यास प्रवीण असणे आवश्यक आहे. लॉर्ड बाडेन पॉवेल यांनी स्काऊटिंग फॉर बॉईज या पुस्तकात संदेशन का महत्त्वाचे आहे हे वर्णन केले आहे. त्यांनी सिग्नलिंग बाबत स्वतंत्र कॅम्पफायर यार्न (अध्याय) लिहिले. हॅम रेडिओचा वापर स्काऊटला सिग्नल करण्यास, संप्रेषण करण्यात आणि सांस्कृतिक वैयक्तिक तांत्रिक माहितीची बदली केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात देखील मदत करू शकतो .
हॅम कोण बनू शकतो?
१२ वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक हॅम परवान्यासाठी अर्ज करू शकतो.
आमच्या हॅम रेडिओ कोर्समध्ये कोण भाग घेऊ शकेल?
केवळ स्काउट्स, गाईड्स , रोव्हर्स, रेंजर्स वयोमर्यादा -12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक.
सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या स्काउट्स, गाईड्स , रोव्हर्स आणि रेंजर्सना इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नलिंग, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात रस असणे आवश्यक आहे.
मूलभूत गणिताची कौशल्ये येणे आवश्यक आहे.
केवळ गंभीर शिकणारे ज्यांना समाज आणि राष्ट्रासाठी सेवा करायची आहे त्यांचे स्वागत आहे.
सहभागी सदस्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की HAM रेडिओ एक छंद आणि सेवा आहे.
अभ्यासक्रम कसा शिकवला जाईल?
शिकवण्याचे माध्यम- इंग्रजी, हिंदी, मराठी
दूरसंचार मंत्रालयाने घेतलेल्या ASOC परीक्षा ही इंग्रजीमध्ये (बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न) असेल .
परीक्षा ही इंग्लिश भाषेत MCQ प्रकारची असल्याने सुस्पष्ट इंग्लिश बोलता येणे आवश्यक नाही, परंतु इंग्लिश लिहिता , वाचता येणे गरजेचे आहे,
कोर्स ऑनलाईन घेण्यात येईल.
हॅम कोर्समध्ये समाविष्ट विषय –
इलेक्ट्रॉनिक्स,
नियम व कायदे ,
मोर्स कोड,
ASOC परवान्यासाठी अर्ज कसा करावा?
आणि बरेच काही.
कोर्स बहुधा दर शनिवार व रविवार रोजी 30 मिनिटांसाठी घेण्यात येईल.
सहभागी होण्याची अंतिम तारीख – २० डिसेंबर २०२०
हॅम कोर्ससाठी नोंदणी कशी करावी?
चरण 1 – allaboutscouting.com वर लॉगिन करा
चरण 2- एक्सक्लूसिव(Exclusive) ला जा.
चरण 3 – Free HAM radio कोर्स निवडा.
चरण 4 – अर्ज योग्यरित्या भरा.
पूर्ण झाले.