स्काऊटचे वचन
“मी माझ्या शीलास स्मरून असे वचन देतो की , ईश्वर आणि स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा , इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि स्काऊटचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करीन .”
स्काऊटचे वचन हे नेहमी स्वतःच्या विवेकी बुद्धीला व आत्मसन्मानाला स्मरून घेतले जाते, कारण की , प्रत्येक व्यक्तीला स्वतः बद्दल कायम आदर असतो . तो स्वतःचा अनादर करून घेतलेले वचन मोडू शकत नाही . त्यामुळे या स्काऊट च्या वचनाची सुरुवात शीलास स्मरून केली जाते .
स्काऊटच्या वचनाचे तीन भाग आहेत.
१ ईश्वर आणि स्वदेश या विषयीचे कर्तव्य करणे –
स्काऊट चळवळ ही अशी चळवळ आहे ज्या मध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक आस्थेचा विचार केला जातो . स्काऊट चळवळीने देवाला झुगारलेले नाही , या उलट तीची देवाच्या प्रती , व्यक्तीच्या धर्मा प्रती आस्था आहे . आपण या समाजात , देशात राहतो त्या देशाचे , समाजाचे आपण ऋणी असतो , समाजातील व्यक्ती म्हणून आपली जी काही कर्तव्ये असतील ती आपण पार पाडली पाहिजेत .
२ इतरांच्या उपयोगी पडणे . –
स्काऊटचा विनामोबदला सेवा हा परमधर्म आहे . याच भावनेतून दररोज न चुकता किमान एक तरी सत्कृत्य करण्याची स्काऊट चळवळीत परंपरा आहे . दररोजचे सत्कृत्य काय असते ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .
३ स्काऊटचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे –
स्काऊट नियमाच्या नऊ भागांचे आचरण केल्याने एक उत्तम सुजाण नागरीक तयार होण्यास मदत होते . आणि आपल्या देशासाठी चांगले नागरीक घडवणे हाच तर स्काऊट चळवळीचा मूळ उद्देश आहे .
वचनाचा उपयोग –
नवीन स्काऊटचा शपथविधी या वचनाच्या उच्चाराने केला जातो .
वचन उच्चारत असताना नेहमी उजव्या हाताने स्काऊटची खूण करावी .
छान उपक्रम आहे