स्काऊट गाईड ना १० वी, १२वी मध्ये वाढीव गुण मिळतात हे खरे आहे का ?
महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार होण्यासाठी व स्काऊट – गाईड चळवळी करिता पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून हा स्काऊट गाईड्स च्या विध्यार्थ्यांना वाढीव गुण(Grace Marks for scout) मिळावेत यासाठी शासन निर्णय पारित करण्यात आला .
त्यानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच बारावी च्या परीक्षेत स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबत महाराष्ट्र शासन शासनाद्वारे दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी शासन निर्णय जारी केला.
स्काऊट गाईड च्या विविध शिबिरांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या अथवा प्राविण्य संपादन करणाऱ्या स्काऊट गाईड साठीच हे मार्क राखीव आहेत .
स्काऊट गाइड्सच्या वाढीव गुणांबाबत सारखे विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे –
१ स्काऊट गाईड ना १० वी, १२वी मध्ये वाढीव गुण मिळतात हे खरे आहे का ?
होय , खरे आहे.
२ कोणत्या स्काऊट आणि गाईड हे गुण मिळतात?
अ राष्ट्रपती पदक विजेते स्काऊट आणि गाईड
ब आंतरराष्ट्रीय जांबोरी मध्ये सहभागी स्काऊट आणि गाईड
क राज्यपाल पदक / राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट आणि गाईड
३ कोणत्या सहभागासाठी किती गुण मिळतात ?
अ राष्ट्रपती पदक विजेते स्काऊट आणि गाईड – १० गुण
ब आंतरराष्ट्रीय जांबोरी मध्ये सहभागी स्काऊट आणि गाईड – १० गुण
क राज्यपाल पदक / राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट आणि गाईड – ३ गुण
४ मी खेळात राज्यस्तरीय सामने खेळलेला खेळाडू आहे तसेच मी स्काऊट गाईड मध्ये सुद्धा आहे , मला किती मार्क मिळतील?
इयत्ता दहावी व बारावी मधील मध्ये शिकत असलेला खेळाडू विद्यार्थी हा एकापेक्षा अधिक खेळात क्रीडा प्रकारात स्पर्धेत एनसीसी तसेच स्काऊट गाईडची शिबिरे यात सहभागी झाला असेल तर त्याला उच्चतम असणाऱ्या एकाच सहभाग किंवा कळविण्याचे प्रवीण याचे प्रवीण याचे प्रावीण्य चे सवलतीचे गुण मिळतील .
५ मी NCC व स्काऊट गाईड दोन्ही मध्ये पात्र आहे , मला दोन्हीचे एकत्रित मार्क मिळतील का ?
नाही . इयत्ता दहावी व बारावी मधील मध्ये शिकत असलेला खेळाडू विद्यार्थी हा एकापेक्षा अधिक खेळात क्रीडा प्रकारात स्पर्धेत एनसीसी तसेच स्काऊट गाईडची शिबिरे यात सहभागी झाला असेल तर त्याला उच्चतम असणाऱ्या एकाच सहभाग किंवा कळविण्याचे प्रवीण याचे प्रवीण याचे प्रावीण्य चे सवलतीचे गुण मिळतील .
६ मी NSS व स्काऊट गाईड दोन्ही मध्ये पात्र आहे , मला दोन्हीचे एकत्रित मार्क मिळतील का ?
नाही . दोन्ही पैकी सर्वात जास्त गुण कशा मध्ये आहेत ते वाढीव गुण देताना ग्राह्य धरले जाईल.
७ हे गुण मिळवण्यासाठीची कार्यपद्धती काय आहे ?
तुम्ही तुमच्या युनिट लीडरकडे आपली सर्व माहिती द्या. ते आपली माहिती आपल्या जिल्ह्याचे स्काऊट गाईड जिल्हा संघटन आयुक्त यांचेकडे तसा अर्ज करतील व माहिती देतील.
त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील स्काऊट गाईडचे जिल्हा संघटन आयुक्त यांच्याद्वारे विशिष्ट नमुन्यात विविध शिबिरे किंवा प्राविण्य पदके मिळवलेल्या तसेच राष्ट्रपती पदक विजेत्या विद्यार्थ्यांची यादी स्वाक्षरीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे सादर करतील. त्यानंतर संबंधित शिक्षण अधिकारी विहित नमुन्यात सदर प्राप्त माहिती ही संबंधित विभागीय शिक्षण मंडळ यांच्या कार्यालयास शिफारसी सह सादर करतील.
८ वाढीव गुण मिळवण्यासाठी स्काऊट आणि गाईड्ना कोणती कागदपत्रे लागतील ?
अ राष्ट्रपती पदक प्रमाणपत्र / आंतरराष्ट्रीय जांबोरी सहभाग प्रमाणपत्र / राज्यापुरस्कार प्रमाणपत्र
ब आपले १० वी किंवा १२वीचे वैध प्रवेशपत्र(हॉल तिकिट)
क युनिट लीडर व शाळेच्या मुख्याध्यापकांचे सही असलेले पत्र
९ स्काऊट गाईड च्या वाढीव गुणांबाबत किती शासन निर्णय आहेत ?
दोन
१० हे शासन निर्णय मला कुठे मिळतील ?
सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या नवीन वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे त्याची लिंक हे आपल्या वेबसाईटवर महत्वाच्या लिंक येथे दिलेली आहे . पाहण्यासाठी येथे क्लिक करा
११ शासन निर्णयात राज्यपुरस्कारासाठी दिलेले गुण सापडत नाहीत, काय करू ?
परिपत्रकातील चौथ्या क्रमांकाची लिंक पहा.
१२ वाढीव गुण मिळतात याचा पुरावा काय ?
2020 या वर्षात दहावीच्या परीक्षेत राज्य पुरस्कार/ राज्यपाल पदक प्राप्त विद्यार्थ्यांना मिळालेले वाढीव गुण खालील प्रमाणे –
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत फेसबुक , व्हाट्सअँप वर शेअर करा. तसेच आमचे विडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या व Subscribe करायला विसरू नका.
I am reday