नमस्कार ,
आपले ऑल अबाउट स्काऊटींग च्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत .
आज आपण माहिती घेणार आहोत दैनिक सत्कृत्याच्या गोष्टीबद्दल. सत्कृत्य काय असते? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. येथे आपण ह्या ब्लॉग मध्ये आपण स्काऊटिंग मध्ये सत्कृत्याची सुरुवात कशी झाली? हे एका गोष्टीचा रुपाने पाहणार आहोत.
एका अज्ञात स्काउटची गोष्ट
ही गोष्ट आहे १९०९ सालची व एका अज्ञात स्काउटची.
व्यापारी व प्रकाशक असलेले अमेरिकेतील गृहस्थ श्री विल्यम डी बॉयस हे एकदा इंग्लंड स्थित लंडनला कामासाठी आले होते आणि त्यांना लंडनमधील कोणत्यातरी ठिकाणी जायचे होते. त्या ठिकाणी जात असताना ते लंडन शहरांमधील पसरलेल्या धुक्यात हरवले व रस्ता चुकले. रस्ता चुकल्याने ते थोडे गडबडले होते .
त्यांची ही अवस्था पाहून रस्त्याने चाललेला एक मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने बॉयसना अभिवादन केले आणि विलियम बॉयसना त्या मुलाने विचारले की, मी काही मदत करू शकतो का?
तेव्हा विल्यम ने आपल्याजवळील कागदावर लिहिलेला पत्ता, त्या मुलास दाखवला. तो पत्ता पाहून मुलाने त्यांना सॅल्यूट केला आणि म्हणाला सर माझ्यासोबत या चला आणि तो मुलगा त्या पत्त्यात नमूद असलेल्या ठिकाणी विल्यम ला घेऊन गेला.
काम झाल्यानंतर विल्यम ने त्या मुलास इनाम म्हणून काही पैसे देऊ केले , परंतु त्या मुलाने विनम्रतेने ते पैसे नाकारले आणि पुन्हा विल्यमना त्याने सॅल्यूट केला आणि त्यांना म्हणाला , “सर, मी एक बॉईज स्काऊट आहे आणि स्काऊट कोणत्याही सेवेला कसलेही मूल्य आकारत नाहीत किंवा स्वीकार करत नाहीत. “
विल्यम ना त्या मुलाचे बोलणे समजले नाही आणि पुन्हा त्यांनी विचारले तू आत्ता काय म्हणत होतास ?
यावर त्या मुलाने पुन्हा एकदा आपले म्हणणे विल्यमना सांगितले. त्यासोबतच त्या मुलाने त्यांना विचारले , “तुम्हाला स्काऊट बाबतीत काही माहिती आहे का?”.
यावर विल्यम म्हणाले, ” नाही , मला याबाबतीत काहीच माहिती नाही, परंतु मला ती जाणून घ्यायला आवडेल. ”
काम पूर्ण झाल्यानंतर विल्यम बॉयसना तो मुलगा स्काऊटिंगचे संस्थापक लॉर्ड बेडन पावेल यांच्याकडे भेटायला घेऊन गेला, आणि या भेटीतच बॉय स्काऊट ऑफ अमेरिकाचा जन्म झाला.
लॉर्ड बेडन पॉवेलना भेटल्यानंतर एक ट्रंक भरून स्काऊट शिक्षणासंबंधीचे सामान घेऊन विल्यम अमेरिकेत परतले. तेथे त्यांनी 1910 साली आपला मित्र श्रीयुत लिविंगस्टोन यांच्यासोबत बॉय स्काऊट ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना केली.
ब्रॉंझ बायसन
या घटनेनंतर त्या अज्ञात स्काऊटच्या सन्मानासाठी अमेरिकी स्काऊट द्वारा, इंग्लंड मध्ये असलेल्या गिलवेल पार्कमध्ये एका अमेरिकी गव्याच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. ही गव्याची प्रतिमा “ब्रॉंझ बायसन” या नावाने प्रसिद्ध आहे.
तर अशीही स्काऊटिंगच्या, सुरुवातीच्या काळामधील ही एका अज्ञात स्काऊटची गोष्ट आहे आणि सत्कृत्त्याचा त्यात उल्लेख आहे.
दैनिक सत्कृत्य काय असते? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत फेसबुक, व्हाट्सअप वर शेअर करा.
जय हिंद ,वंदे मातरम.
One thought on “स्काऊटिंग मध्ये सत्कृत्याची सुरुवात कशी झाली?”