स्काऊट – गाईड झंडा गीत
भारत स्काऊट गाईड झंडा ऊँचा सदा रहेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा , ऊँचा सदा रहेगा || धृ ||
नीला रंग गगन सा विस्तृत भ्रातृभाव फैलता ,
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता
और चक्र कहता हैं प्रतिपल आगे कदम बढ़ेगा ,
ऊँचा सदा रहेगा झंडा , ऊँचा सदा रहेगा || १ ||
मुळात हिंदी मध्ये असलेले हे झंडा गीत श्री दया शंकर भट यांनी रचले आहे .
स्काऊट हे झंडा गीत विविध स्काऊट च्या कार्यक्रमात वापरतात . ध्वजारोहण कार्यक्रमात सावधान स्थिती मध्ये उभारून योग्य चालीवर झंडा गीत म्हटले जाते.
स्काऊट गाईड मेळाव्याच्या किंवा अन्य कार्यक्रमाच्या वेळी ह्या गीताचे फक्त पहिले कडवे म्हटले जाते. हे पहिले कडवे ४५ सेकंदात म्हटले जाते.
झंडा गीताच्या चालीसाठी तुम्ही हा खालील विडिओ पाहू शकता तसेच सोबत पाठांतर करू शकता .
सर्व स्काऊट ना हे संपूर्ण गीत चालीवर म्हणता आले पाहिजे व त्याचा अर्थ त्यांना माहित असला पाहिजे .
संपूर्ण भारत स्काऊट गाईड झंडा गीत खालील प्रमाणे –
भारत स्काऊट गाईड झंडा ऊँचा सदा रहेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा , ऊँचा सदा रहेगा || धृ ||
नीला रंग गगन सा विस्तृत भ्रातृभाव फैलता ,
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता
और चक्र कहता हैं प्रतिपल आगे कदम बढ़ेगा ,
ऊँचा सदा रहेगा झंडा , ऊँचा सदा रहेगा || १ ||
ये चौबीसो आरे चक्र के हमसे प्रतिपल कहते
सावधान चौबीसो घंटे , हममें हैं बल भरते
तत्पर सदा रहे सेवामें जीवन सफल बनेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा , ऊँचा सदा रहेगा || २ ||
परहित रक्षामें हम जीवन , हँस हँस दे दे अपना
इस झंडेपर मरमिटनेका हैं सुखदायी सपना
सेवा का पथ दर्शक झंडा घरघरमें फहरेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा , ऊँचा सदा रहेगा || ३ ||
भारत स्काऊट गाईड झंडा ऊँचा सदा रहेगा
झंडा गीताचा अर्थ –
भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचा हा ध्वज कायम उंच फडकत राहील . निळा रंग जो या विस्तृत आकाशाप्रमाणे आहे तो बंधुभाव पसरवतो. ध्वजातील त्रिदल कमळ हे स्काऊट च्या तीन प्रतिज्ञाची आठवण करून देते . त्यामधील २४ आरे असलेले चक्र सांगत आहे की , आपले पाऊल प्रतीक्षण पुढेच पडत राहील .
असा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील .
ध्वजातील चक्रामधील २४ आरे आपणास प्रत्येक क्षणी सांगत आहेत की , दिवसाचे २४ तास सावध रहा किंवा सदैव जागृत रहा . तसेच हे चक्र आपल्या मध्ये सावधानतेची जणू शक्ती भरत आहे . सदैव सांगत आहे की , सेवेमध्ये कायम तत्पर रहाल तरच तुमचे जीवन सफल बनेल . असा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील .
आपण आपले जीवन इतरांच्या कल्याणासाठी हसत हसत दिले पाहिजे . या ध्वजाच्या सन्मानासाठी आपण आपले जीवन समर्पित करण्याचे आपले स्वप्न असले पाहिजे . सेवेचा प्रतीक असलेला हा झेंडा आपल्याला घरोघरी फडकवायचा आहे . असा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील .