जागतिक स्काऊट ध्वज हा जगातील सर्व स्काऊटचे प्रतिक आहे.
पार्श्वभूमी –
जागतिक स्काऊट ध्वजाची निवड ही लिस्बन येथे झालेल्या 1961 मध्ये जागतिक स्काऊट परिषदेमध्ये करण्यात आली.
जागतिक स्काऊट ध्वजाचे वर्णन व आकार-
जागतिक स्काऊट ध्वज हा जांभळ्या रंगाचा असून त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे जागतिक स्काऊट पदक आहे. या पदकाच्या भोवताली दोरींचे कडे असून त्या दोरीची टोके ही सुकर गाठीने बांधली आहेत. या ध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण 3: 2 असून त्याची लांबी 135 सेमी व रुंदी 90 सेमी आहे. मध्यभागी बनलेल्या चिन्हाचा आकार 45 × 30 सेमी इतका आहे.
जागतिक स्काऊट ध्वज काय दर्शवतो?
जागतिक स्काऊट ध्वजातील तीन पाकळ्या हया स्काऊट चळवळीचे जनक बेडन पॉवेल यांनी सांगितलेल्या प्रतिज्ञेच्या तीन भागांची आठवण करून देतात.
मध्यभागी असलेली सुई योग्य दिशा दाखवते म्हणजेच स्काऊटना योग्य मार्गावर चालायचे आहे हे सांगते.
त्याच बरोबर दोन तारे हे सत्य व ज्ञानाचे प्रतिक असून स्काऊटची प्रतिज्ञा व नियमांची आठवण करून देतात.
सभोवतालचे दोरीचे कडे हे जागतिक स्काऊट संघटना दर्शवते व त्या दोरीच्या टोकांची बांधलेली सुकर गाठ स्काऊटच्या विश्वबंधुत्वाची जाणीव करून देते.
या विषयी पण जरूर वाचा –
स्काऊट रेल्वे भरती प्रश्नपत्रिका
जागतिक स्काऊट ध्वजाचा उपयोग –
जागतिक स्काऊट ध्वजाचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिबिर व कार्यक्रमांमध्ये केला जातो.
जागतिक स्काऊट ध्वज फडकवत असताना त्याच्या डाव्या बाजूस थोड्या जास्त उंचीवर राष्ट्रध्वज तर उजव्या बाजूस थोड्या कमी उंचीवर राष्ट्रीय स्काऊट गाईड संघटनेचा ध्वज फडकवला जातो.
ज्या शिबिरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशांचे स्काऊट सहभागी होतात तेथे हा जागतिक स्काऊट ध्वज फडकवला जातो.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत फेसबुक , व्हाट्सअँप वर शेअर करा. तसेच आमचे विडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या व Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद .
जय हिंद । वंदे मातरम ।।
आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा