नमस्कार मित्रांनो तुमचे allaboutscouting.com मध्ये स्वागत!!
आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे. वाढती लोकसंख्या व घटत्या सरकारी नोकऱ्यां यामुळे सरकारी नोकरी मिळणे अशक्यच परंतु एक असा मार्ग आहे जो तुम्ही आपले शिक्षण पूर्ण करत असताना अवलंबला व त्यानुसार चाललात तर ही नोकऱ्यांची स्पर्धा तुम्ही सहजपणे जिंकून जाल. हया मार्गाची माहिती घेण्यापूर्वी आपणास काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे त्याविषयीची माहिती आपण सर्वप्रथम घेऊयात.
- 1)स्काऊट – गाईड म्हणजे काय?
- 2)कोटा म्हणजे काय?
- 3) रेल्वे भर्ती मध्ये स्काऊट गाईड कोटा नेमका काय असतो?
(1) स्काऊट – गाईड म्हणजे काय ?
स्काऊट-गाईड ही एक तरुणांची चळवळ असून तिचा उद्देश हा राष्ट्रप्रेमी स्वच्छ चारित्र्याचे नागरिक घडवणे आहे.लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी तरुणांसाठी मूल्यांवर आधारित व ‘सेवा’ या मूल्यांचा उद्देश असणारी चळवळ ही 20 व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापना केली.
ही चळवळ गैरराजकीय, शैक्षणिक चळवळ आहे व तरुणांना स्वयंपूर्ण, आनंदी जीवन जगण्यास मार्ग दाखवणारी आहे. स्काऊट गाईड चळवळ जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये अस्तित्वात असून जागतिक पातळीवर काम करते.
भारतामध्ये स्काऊट गाईड चळवळ –
सन 1909 पासून स्काऊट गाईड चळवळ भारतामध्ये कार्यरत आहे. पंडित मदन मोहन मालवीय, पंडित हृदयनाथ कुंजरू, पंडित श्रीराम वाजपेयी,डॉ अॅनी बेझंट आदी. मान्यवरांनी स्काऊट गाईड चळवळ भारतात रुजवण्यासाठी मोठे कार्य केले.
पुणे येथील खडकी मध्ये स्थापना झालेल्या स्काऊट ट्रूप भारतामधील काही पहिल्या स्थापन झालेल्या ट्रूप मध्ये होता.
स्वातंत्र्यानंतर दि. 7 नोव्हेंबर 1950 स भारताच स्काऊट – गाईड चालवण्यासाठी “द भारत स्काऊट अँन्ड गाईड” या संघटनेची स्थापना करण्यात आली.
द भारत स्काऊट्स अँन्ड गाईड विषयी –
भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर स्काऊट गाईड चळवळ चालवण्यासाठी द भारत स्काऊट्स अँड गाईडस ची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये WOSM व WAGGGS या स्काऊटीग व गाईडिंग च्या अनुक्रमे आतंरराष्ट्रीय संघटनाची मान्यता प्राप्त व भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त ‘द भारत स्काऊट्स अँड गाईडस’ ही स्काऊट गाईड चळवळीचे काम करणारी एकमान्य संघटना आहे.
‘ द भारत स्काऊट अँड गाईड्स’ ही एक ऐच्छिक गैर राजकीय, शैक्षणिक चळवळ असून ती सर्व तरुणांसाठी वंश, जात, धर्म, वर्ण आदी भेदाशिवाय खुली आहे.’
लॉर्ड बेडन पावेल यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार तिचे संचालन केले जाते.
१२ ते १८ वर्षातील तरुण मुले व मुली या संस्थेचे सभासद/ सदस्य होतात व स्काऊट गाईड चळवळीचा भाग होतात त्यांना अनुक्रमे स्काऊट व गाईड म्हटले जाते. म्हणजेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना “स्काऊट” व १२ ते १८ वयोगटातील मुलींना “गाईड” म्हटले जाते.
स्काऊट – गाईड चळवळीमध्ये कसे सहभागी व्हायचे? ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक(Click) करा.
(2) (Quota) कोटा म्हणजे काय?
‘Quota’इंग्रजी भाषेचे शब्द असून त्याचा अर्थ राखीव असा होतो.
(3) रेल्वे भरती मध्ये स्काऊट – गाईड कोटा नेमका काय असतो?
स्काऊट – गाईडची मौल्यवान मूल्ये भारतीय नागरिकात रुजावी व भारताची प्रगती व्हावी, जास्तीत जास्त तरुण या चळवळीचा भाग व्हावेत यासाठी प्रोत्साहन म्हणून भारतीय रेल्वे ही त्यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये काही जागा हया स्काऊट गाईड चळवळीत कार्यरत असणाऱ्या तरुणांसाठी राखीव ठेवते. या पदांसाठीच्या नोकऱ्यांमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही स्काऊट – गाईड चळवळीत चांगल्या प्रमाणात कार्यरत असणे आवश्यक आहे.
या स्काऊट-गाईड राखीव कोट्याच्या भर्ती मध्ये फक्त आणि फक्त स्काऊट – गाईड अर्ज करू शकतात. त्यामुळे त्यांना स्काऊट – गाईड चळवळीत कार्यरत असताना, रोजी रोटी कमावण्याची संधी मिळते. तसेच सामान्य जागांसाठी ची जीवघेणी स्पर्धा पूर्णतः कमी होते.
भारतीय रेल्वे द्वारा वेळोवेळी स्काऊट गाईड साठी राखीव पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. रेल्वेच्या प्रत्येक झोन/ विभागासाठी स्वातंत्र्य भरती प्रक्रिया राबवली जाते.
स्काऊट गाईड साठी राखीव रेल्वे भरतीची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी/ सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
स्काऊट गाईड राखीव रेल्वे भरतीच्या पात्रते विषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आपण allaboutscouting ब्लॉगला भेट दिलीत व येथेपर्यंत वाचन केलेत त्याबद्दल आपले आभार!
जर तुम्हाला स्काऊट गाईड विषयी अजून माहिती घ्यावयाची असेल तर आमच्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.
जय हिंद ! वंदे मातरम !!